प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली दि. १७/०१/२०२६ रोजी कामधेनू शेतकरी गट, गोठोस यांच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. दिपक नारकर, गावचे सरपंच श्री. सुरज कदम, डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या वतीने श्री. एकनाथ सावंत, गटाचे अध्यक्ष श्री. विष्णू तामाणेकर, गटाचे सभासद व गावातील भात उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


