प्रशिक्षण वेळापत्रक
.
आमचे प्रेरणास्थान
डॉ.बाबासाहेब लेले स्मारक समिती संचालित
डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प,माणगाव
आमचे उपक्रम
******
कोकणातील शेतीमधील प्रमुख पीक म्हणजे तांदूळ. जवळपास 99% लोक तांदूळ हे पीक घेऊन भात शेती करतात. खूप पाऊस असल्याकारणाने या भागात भातशेती केली जाते. जवळपास दसऱ्यानंतर पीक कापणीला येईल अशा प्रकारची तांदळाची बियाणे वापरून येथील शेतकरी भात करतो. तांदुळासोबतच मिळणारे गवत हे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न या शेतीतून त्याला भागवता येतो.

डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव गेली अनेक वर्षे माणगाव आणि परिसरातील लोकांना शेतीविषयक सर्व मार्गदर्शन, शंका-कुशंका या सर्वांचे मार्गदर्शन केंद्र करणारे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.

मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले संशोधन कार्य हळूहळू पुढे सरकत असून जैव रसायन उद्योग निर्मितीचे नवीन दालन येत्या काही वर्षात डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाच्या साह्याने सुरू होईल. असा विश्वास दिसू लागला आहे.

नवउद्योजक आपल्या व्यवसायास स्थिर व्हावेत, म्हणून गेली काही वर्षे प्रकल्पाच्या नवउद्योजक सहायता विभागाद्वारे नवीन उद्योगांना छोट्या प्रमाणात काम (जॉब वर्क) दिले जाते.
कार्यक्रम
साजरे केलेले समारंभ
प्रकल्पासोबत संलग्न व्हा
महत्त्वाच्या घडामोडींसाठी