उद्योजक मेळावा

ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून ३ ते ७ वर्ष व्यवस्थित व्यवसाय चालवतात अशा उद्योजकांचा उद्योजक मेळावा करून त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यावे व समाजासमोर आणावे अशा प्रकारचा विचार संस्थेच्या नोव्हेंबर २०२२ च्या बैठकीमध्ये झाला. त्यानंतर जिल्ह्यातील १०० विविध व्यवसाय करणाऱ्या नव उद्योजकांची यादी करण्यात आली.या सर्वांना विश्वस्त तसेच समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.  दिनांक १२/२/२०२३ मध्ये झालेल्या उद्योजक मेळाव्यामध्ये

१) काजू प्रक्रिया उद्योजक 32

२) फळ प्रक्रिया उद्योजक 35

३) अन्य उद्योजक ७

असे एकूण ७४ उद्योजकांचा या मेळाव्यामध्ये शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ५ उद्योजकांना प्राथमिक स्वरूपात भाषण करण्याची संधी देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित श्री सतीशज मोढ (प्रांत संघचालक,  रा. स्व. संघ) यांनी संबोधित केले यावेळी 350 च्या दरम्यान उद्योजक,  नागरिक उपस्थित होते.