तांत्रिक प्रशिक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी संस्थेने काजू बी प्रशिक्षण, फळप्रक्रिया प्रशिक्षण व  यंत्र निगा व दुरुस्ती प्रशिक्षण  असे तीन  प्रकारची प्रशिक्षणे वर्षातून किमान दोन वेळा संस्था आयोजित करते. काजू बी प्रक्रिया प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी प्रकल्पावर येऊन प्रात्यक्षिकाच्या आधारे प्रशिक्षण घेतात व आपल्या गावामध्ये जाऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करतात. तसेच इतर तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देतात. ही या प्रकल्पाची उपलब्धी आहे. फळ प्रक्रिया प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा विविध फळांची सरबते, जाम, रस लोणची, चॉकलेट, जेली इत्यादी उत्पादने निर्माण करण्याचे प्रशिक्षण 1990 पासून या प्रकल्पामध्ये सुरू करण्यात आले आहे. जवळ जवळ ८००० जणांनी वरील प्रकारची प्रशिक्षणे घेतली असून अनेक जणांनी आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण करून महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी छाप पाडलेली आहे. उद्योग धंद्यात प्रशिक्षित करून अशा नवद्योजाकांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे ठाम उभे राहण्याचे कार्य हि संस्था करत आहे. आजही या संस्थे मधून प्रशिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी या संस्थेच्या कामात दिसतात तेव्हा त्याची आपणास प्रचीती येते. तसेच  संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ १०००००  आसपासच्या शेतकऱ्यांकडून आंबा, जांभूळ, करवंद, कैरी, फणस योग्य दरामध्ये खरेदी करून शेतकऱ्यांच्या हाताला चार पैसे मिळतील, या दृष्टिकोनातून पाहिले जाते.