शेतकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर नॅब नेत्ररुग्णालय सावंतवाडी आणि गुरुकृपा शेतकरी गट,खुटवळगांव व श्री रामेश्वर माऊली शेतकरी गट, घावनळे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १७/३/२०२६ रोजी श्री. नयन नागवेकर व मयुर दुग्ध व्याव. सहकारी संस्था अशा २ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी ७२ जणांनी या शिबीराचा लाभ घेतला. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सवलतीच्या दरात चष्मे देण्यात येणार…
डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगांव येथे महिला समितीची बैठक. रक्षाबंधन, वसुबारस कार्यक्रम, नववर्ष स्वागत यात्रा, राममंदीर अक्षता वाटप, भारतमाता पुजन, गोळवली प्रकल्प भेट – प्रशिक्षण, पिंगुळी वसतीगृह भेट – किशोरीताई, योगदिन इ. विषय महिला सामितीच्या वतीने करण्यात आले आहेत पंचपरिवर्तनपर्यावरण, स्व-बोध, समरसता, नागरी संहिता, कुंटुब प्रबोधन या विषयी सौ. नेहा चव्हाण यांनी विषय मांडला. १) पर्यावरण विषय घेऊन समितीच्या माध्यमातून काम…
प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली दि. १७/०१/२०२६ रोजी कामधेनू शेतकरी गट, गोठोस यांच्या माध्यमातून भात खरेदी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. दिपक नारकर, गावचे सरपंच श्री. सुरज कदम, डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या वतीने श्री. एकनाथ सावंत, गटाचे अध्यक्ष श्री. विष्णू तामाणेकर, गटाचे सभासद व गावातील भात उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
आपल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव,तालुका-कुडाळ,जिल्हा-सिंधुदुर्ग.४१६५१९ च्या वतीने काजू बी प्रक्रिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण २१ मार्च ते २८ मार्च २०२५ या दरम्यान सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेमध्ये संपन्न होणार आहे.आपण या प्रशिक्षणासाठी इच्छुक असाल तर ९४०३०७५७२०, ९२८४२६७४९६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निच्छित करावा.तसेच गरजूंपर्यंत हा संदेश पोहचवावा.
आपल्या डॉक्टर हेडगेवार सेवा प्रकल्पामध्ये काजू बी प्रक्रिया हे अतिशय महत्वपूर्ण प्रशिक्षण दिनांक-०९ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षणासाठी एकूण ०८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.यात संवाद सत्र,प्रकल्प माहिती, संघ परिचय तसेच उद्योगात आवश्यक असलेले आर्थिक व्यवस्थापन, काजू पूरक व्यवसाय,यशस्वी उद्योजकांची मुलाखत,मार्केटिंग रचना या व अश्या अनेक विषयांवर माग्रदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष काजू कारखान्यास भेट देऊन प्रशिक्षणार्थी यांना…
डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प महिला समिती च्या कार्यकर्त्यांची श्री.गोळवलकर गुरुजी ग्रामविकास प्रकल्प,गोळवली ला दिनांक-१८ व १९ जानेवारी २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली .साबण बनवणे ,धूप कांडी, फिनेल, पोहे, पापड याचे प्रशिक्षण तसेच गो शाळेला भेट दिली. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री चंद्रशेखर देशपांडे व सौ. वनिता देशपांडे यांच्याबरोबर चर्चा करून प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच समिती म्हणून आपण काय काम आपल्या…
गुरुवार दिनांक-१६ जानेवारी २०२५ रोजी श्री.अर्जुन यशवंत चांदेकर (मान.प्रांत संघचालक, कोकण प्रांत) यांच्या शुभ हस्ते प्रकल्पाच्या प्रशिक्षण व निवास केंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रकल्पाचे विश्वस्त, समिती कार्यकर्ते, शेतकरी,उद्योजक, हितचिंतक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या कामा संदर्भात तसेच इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती दिली.
संस्थेला श्री. सुनिल मरभळ साहेब ( सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ) यांनी दिनांक-२५/१०/२०२४ रोजी संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी क्लस्टर, संशोधन, प्रशिक्षण, उत्पादन, ग्रामविकास याविषयी माहिती घेतली. संस्थेचे चाललेले काम खुप आवश्यक व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
उद्योजक मार्गदर्शन मेळावा.कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर फाऊंडेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा- सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७/०९/२०२४ रोजी २:३० वाजता डॉ. हेडगेवार प्रकल्प,माणगाव येथील कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर च्या सर्व सभासदांसाठी तसेच नजीकच्या काजू प्रक्रिया उद्योजक व काजू तसेच आंबा बागायतदार यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग…
संकुल बैठकडॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून बुधवार दि. २१/०८/२४ रोजी संध्या ७.३० ते ९.३० या वेळेत श्री. तुळशीदास काष्टे (भुईवाडा) यांच्या घरी माणगाव/ आंबडपाल या संकुलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आंबडपाल- ४, तुळसूली-३, घावनळे- ४ , नमसगांव- २, भुईवाडा- ५, माणगांव -२ असे एकूण ६ गावातील प्रमुख २० शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला परिचय, त्यानंतर घावनळे, आंबडपाल , भुईवाडा व…
