संस्थेच्या महिला समितीची गोळवली प्रकल्पास भेट

डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प महिला समिती च्या कार्यकर्त्यांची श्री.गोळवलकर गुरुजी ग्रामविकास प्रकल्प,गोळवली ला दिनांक-१८ व १९ जानेवारी २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली .साबण बनवणे ,धूप कांडी, फिनेल, पोहे, पापड याचे प्रशिक्षण तसेच गो शाळेला भेट दिली. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री चंद्रशेखर देशपांडे व सौ. वनिता देशपांडे यांच्याबरोबर चर्चा करून प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच समिती म्हणून आपण काय काम आपल्या…

प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा……

गुरुवार दिनांक-१६ जानेवारी २०२५ रोजी श्री.अर्जुन यशवंत चांदेकर (मान.प्रांत संघचालक, कोकण प्रांत) यांच्या शुभ हस्ते प्रकल्पाच्या प्रशिक्षण व निवास केंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रकल्पाचे विश्वस्त, समिती कार्यकर्ते, शेतकरी,उद्योजक, हितचिंतक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या कामा संदर्भात तसेच इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती दिली.

श्री. सुनिल मरभळ साहेब ( सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ) यांची संस्थेला भेट दिली.

संस्थेला श्री. सुनिल मरभळ साहेब ( सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ) यांनी दिनांक-२५/१०/२०२४ रोजी संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी क्लस्टर, संशोधन, प्रशिक्षण, उत्पादन, ग्रामविकास याविषयी माहिती घेतली. संस्थेचे चाललेले काम खुप आवश्यक व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

उद्योजक मार्गदर्शन मेळावा

उद्योजक मार्गदर्शन मेळावा.कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर फाऊंडेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा- सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७/०९/२०२४ रोजी २:३० वाजता डॉ. हेडगेवार प्रकल्प,माणगाव येथील कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर च्या सर्व सभासदांसाठी तसेच नजीकच्या काजू प्रक्रिया उद्योजक व काजू तसेच आंबा बागायतदार यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग…

ग्रामविकास संकुल बैठक-आंबडपाल, माणगाव

संकुल बैठकडॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून बुधवार दि. २१/०८/२४ रोजी संध्या ७.३० ते ९.३० या वेळेत श्री. तुळशीदास काष्टे (भुईवाडा) यांच्या घरी माणगाव/ आंबडपाल या संकुलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आंबडपाल- ४, तुळसूली-३, घावनळे- ४ , नमसगांव- २, भुईवाडा- ५, माणगांव -२ असे एकूण ६ गावातील प्रमुख २० शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला परिचय, त्यानंतर घावनळे, आंबडपाल , भुईवाडा व…

ग्रामविकास संकुल बैठक – मळगाव

आज शुक्रवार दि. १६/०८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री. सखाराम नाईक, न्हावेली येथे मळगांव संकुल बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी ४ गावातील ९ पुरुष ३ महिला उपस्थित होते. श्री. विनयजी कानडे ( ग्रामविकास प्रमुख, महाराष्ट्र प्रांत) यांनी बैठकीला मार्गदर्शन केले आहेत. त्यानंतर श्री. नाईक यांनी घरी बसवलेली सौर ऊर्जा युनिट याविषयी माहिती घेतली. त्यानंतर भूमाता शेतकरी गटाच्या माध्यमातून भोपळा लागवड…

विचारमंथन बैठक ,गोळवली रत्नागिरी

डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव यांच्या विश्वस्तांची बैठक गोळवली प्रकल्प संगमेश्वर,रत्नागिरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सन्माननीय भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांत प्रचारक तसेच प्रांत संघचालक उपस्थित होते. यावेळी विश्वास प्रकल्पाचे विश्वस्त व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भैय्याजी जोशी यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या पुढील कालखंडामध्ये प्रकल्पाचा…

शेतकरी गट प्रशिक्षण वर्ग- २०२४

आज रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी श्री दत्त मंदिर, माणगाव येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी १५ गावातील ५६ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत, दीप प्रज्वलन, परिचय व प्रास्ताविक झाले त्यानंतर गटश: निवेदन (मळगाव, गोठोस, अंबडपाल, घावनळे) या शेतकरी गटांचे झाले. त्यानंतर श्री सुमंतजी आमसेकर यांनीसामूहिक कार्य व कार्यकर्ता असे चर्चात्मक सत्र घेतले. भोजनोत्तर ग्राम…

केंद्रीय उद्योगमंत्र्यांकडून क्लस्टर उभारणीची पाहणी

डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प हा जिल्ह्यातील तरुणांना काम देणारा प्रकल्प आहे……केंद्रीय मंत्री नारायण राणेडॉ.बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉ.हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प यांच्यावतीने होत असलेल्या कोकण सिंधू मल्टीफ्रुट क्लस्टर फाउंडेशनच्या उभारणीच्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांचे प्रकल्पामध्ये आगमन झाले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या क्लस्टरच्या बांधकामाचे निरीक्षण केले. डॉक्टर हेडगेवार स्मृती…

उद्योजक मेळावा

ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून ३ ते ७ वर्ष व्यवस्थित व्यवसाय चालवतात अशा उद्योजकांचा उद्योजक मेळावा करून त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यावे व समाजासमोर आणावे अशा प्रकारचा विचार संस्थेच्या नोव्हेंबर २०२२ च्या बैठकीमध्ये झाला. त्यानंतर जिल्ह्यातील १०० विविध व्यवसाय करणाऱ्या नव उद्योजकांची यादी करण्यात आली.या सर्वांना विश्वस्त तसेच समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.  दिनांक १२/२/२०२३…