आपल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव,तालुका-कुडाळ,जिल्हा-सिंधुदुर्ग.४१६५१९ च्या वतीने काजू बी प्रक्रिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण २१ मार्च ते २८ मार्च २०२५ या दरम्यान सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेमध्ये संपन्न होणार आहे.आपण या प्रशिक्षणासाठी इच्छुक असाल तर ९४०३०७५७२०, ९२८४२६७४९६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निच्छित करावा.तसेच गरजूंपर्यंत हा संदेश पोहचवावा.
आपल्या डॉक्टर हेडगेवार सेवा प्रकल्पामध्ये काजू बी प्रक्रिया हे अतिशय महत्वपूर्ण प्रशिक्षण दिनांक-०९ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षणासाठी एकूण ०८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.यात संवाद सत्र,प्रकल्प माहिती, संघ परिचय तसेच उद्योगात आवश्यक असलेले आर्थिक व्यवस्थापन, काजू पूरक व्यवसाय,यशस्वी उद्योजकांची मुलाखत,मार्केटिंग रचना या व अश्या अनेक विषयांवर माग्रदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष काजू कारखान्यास भेट देऊन प्रशिक्षणार्थी यांना…

डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प महिला समिती च्या कार्यकर्त्यांची श्री.गोळवलकर गुरुजी ग्रामविकास प्रकल्प,गोळवली ला दिनांक-१८ व १९ जानेवारी २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली .साबण बनवणे ,धूप कांडी, फिनेल, पोहे, पापड याचे प्रशिक्षण तसेच गो शाळेला भेट दिली. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री चंद्रशेखर देशपांडे व सौ. वनिता देशपांडे यांच्याबरोबर चर्चा करून प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच समिती म्हणून आपण काय काम आपल्या…

गुरुवार दिनांक-१६ जानेवारी २०२५ रोजी श्री.अर्जुन यशवंत चांदेकर (मान.प्रांत संघचालक, कोकण प्रांत) यांच्या शुभ हस्ते प्रकल्पाच्या प्रशिक्षण व निवास केंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रकल्पाचे विश्वस्त, समिती कार्यकर्ते, शेतकरी,उद्योजक, हितचिंतक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या कामा संदर्भात तसेच इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती दिली.

संस्थेला श्री. सुनिल मरभळ साहेब ( सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ) यांनी दिनांक-२५/१०/२०२४ रोजी संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी क्लस्टर, संशोधन, प्रशिक्षण, उत्पादन, ग्रामविकास याविषयी माहिती घेतली. संस्थेचे चाललेले काम खुप आवश्यक व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

उद्योजक मार्गदर्शन मेळावा.कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर फाऊंडेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा- सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७/०९/२०२४ रोजी २:३० वाजता डॉ. हेडगेवार प्रकल्प,माणगाव येथील कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर च्या सर्व सभासदांसाठी तसेच नजीकच्या काजू प्रक्रिया उद्योजक व काजू तसेच आंबा बागायतदार यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग…

संकुल बैठकडॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या माध्यमातून बुधवार दि. २१/०८/२४ रोजी संध्या ७.३० ते ९.३० या वेळेत श्री. तुळशीदास काष्टे (भुईवाडा) यांच्या घरी माणगाव/ आंबडपाल या संकुलाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आंबडपाल- ४, तुळसूली-३, घावनळे- ४ , नमसगांव- २, भुईवाडा- ५, माणगांव -२ असे एकूण ६ गावातील प्रमुख २० शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला परिचय, त्यानंतर घावनळे, आंबडपाल , भुईवाडा व…

आज शुक्रवार दि. १६/०८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री. सखाराम नाईक, न्हावेली येथे मळगांव संकुल बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी ४ गावातील ९ पुरुष ३ महिला उपस्थित होते. श्री. विनयजी कानडे ( ग्रामविकास प्रमुख, महाराष्ट्र प्रांत) यांनी बैठकीला मार्गदर्शन केले आहेत. त्यानंतर श्री. नाईक यांनी घरी बसवलेली सौर ऊर्जा युनिट याविषयी माहिती घेतली. त्यानंतर भूमाता शेतकरी गटाच्या माध्यमातून भोपळा लागवड…

डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव यांच्या विश्वस्तांची बैठक गोळवली प्रकल्प संगमेश्वर,रत्नागिरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सन्माननीय भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांत प्रचारक तसेच प्रांत संघचालक उपस्थित होते. यावेळी विश्वास प्रकल्पाचे विश्वस्त व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भैय्याजी जोशी यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या पुढील कालखंडामध्ये प्रकल्पाचा…