उद्योजक मार्गदर्शन मेळावा

उद्योजक मार्गदर्शन मेळावा.
कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर फाऊंडेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा- सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७/०९/२०२४ रोजी २:३० वाजता डॉ. हेडगेवार प्रकल्प,माणगाव येथील कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर च्या सर्व सभासदांसाठी तसेच नजीकच्या काजू प्रक्रिया उद्योजक व काजू तसेच आंबा बागायतदार यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग चे महाव्यवस्थापक श्री.दामले साहेब ,स्टेट बँक ऑफ इंडिया चे श्री. निखिल श्रीवास्तव (चीफ मॅनेजर, पणजी व सिंधदुर्ग )श्रीम. सना मालवणकर मॅडम (चीफ मॅनेजर सिंधुुदुर्ग),श्री. परमेश्वर नवघरे सर, जगदीश पडेलकर सर,सागर खांडे सर(मॅनेजर कुडाळ ब्रांच), कोकण मल्टी फ्रूट क्लस्टरचे अध्यक्ष श्री शिवराम वारंग,रामचंद्र सातार्डेकर तसेच इतर संचालक, उद्योजक इत्यादी उपस्थित होते. यामधे श्री दामले साहेब यांनी जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनांची माहिती व इतर सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया चे परमेश्वर नवघरे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन व योजना यांचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला ४१ उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवराम वारंग सर तर सूत्रसंचालन श्री एकनाथ सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन अक्षय येडगे यांनी केले.

Tags:

Leave a comment