आपल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव,तालुका-कुडाळ,जिल्हा-सिंधुदुर्ग.४१६५१९ च्या वतीने काजू बी प्रक्रिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण २१ मार्च ते २८ मार्च २०२५ या दरम्यान सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेमध्ये संपन्न होणार आहे.आपण या प्रशिक्षणासाठी इच्छुक असाल तर ९४०३०७५७२०, ९२८४२६७४९६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निच्छित करावा.तसेच गरजूंपर्यंत हा संदेश पोहचवावा.
आपल्या डॉक्टर हेडगेवार सेवा प्रकल्पामध्ये काजू बी प्रक्रिया हे अतिशय महत्वपूर्ण प्रशिक्षण दिनांक-०९ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षणासाठी एकूण ०८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.यात संवाद सत्र,प्रकल्प माहिती, संघ परिचय तसेच उद्योगात आवश्यक असलेले आर्थिक व्यवस्थापन, काजू पूरक व्यवसाय,यशस्वी उद्योजकांची मुलाखत,मार्केटिंग रचना या व अश्या अनेक विषयांवर माग्रदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष काजू कारखान्यास भेट देऊन प्रशिक्षणार्थी यांना…