आज शुक्रवार दि. १६/०८/२०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री. सखाराम नाईक, न्हावेली येथे मळगांव संकुल बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी ४ गावातील ९ पुरुष ३ महिला उपस्थित होते. श्री. विनयजी कानडे ( ग्रामविकास प्रमुख, महाराष्ट्र प्रांत) यांनी बैठकीला मार्गदर्शन केले आहेत. त्यानंतर श्री. नाईक यांनी घरी बसवलेली सौर ऊर्जा युनिट याविषयी माहिती घेतली. त्यानंतर भूमाता शेतकरी गटाच्या माध्यमातून भोपळा लागवड प्रक्षेत्राची पाहणी केली. यावेळी सौ. वनिता देशपांडे, श्री. बाळकृष्ण चव्हाण, सौ. नेहा चव्हाण व मळगांव संकुल प्रमुख श्री. रामकृष्ण पंतवालावलकर हे उपस्थित होते. पुढील संकुल बैठक रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मळगांव येथे ठराविण्यात आली आहे.