आमचे उपक्रम
आमची कार्यपद्धती
कोकणातील शेतीमधील प्रमुख पीक म्हणजे तांदूळ. जवळपास 99% लोक तांदूळ हे पीक घेऊन भात शेती करतात. खूप पाऊस असल्याकारणाने या भागात भातशेती केली जाते. जवळपास दसऱ्यानंतर पीक कापणीला येईल अशा प्रकारची तांदळाची बियाणे वापरून येथील शेतकरी भात करतो. तांदुळासोबतच मिळणारे गवत हे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न या शेतीतून त्याला भागवता येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी संस्थेने काजू बी प्रशिक्षण, फळप्रक्रिया प्रशिक्षण व यंत्र निगा व दुरुस्ती प्रशिक्षण असे तीन प्रकारची प्रशिक्षणे वर्षातून किमान दोन वेळा संस्था आयोजित करते.
डॉक्टर बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव गेली अनेक वर्षे माणगाव आणि परिसरातील लोकांना शेतीविषयक सर्व मार्गदर्शन, शंका-कुशंका या सर्वांचे मार्गदर्शन केंद्र करणारे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.
मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले संशोधन कार्य हळूहळू पुढे सरकत असून जैव रसायन उद्योग निर्मितीचे नवीन दालन येत्या काही वर्षात डॉक्टर हेडगेवार प्रकल्पाच्या साह्याने सुरू होईल. असा विश्वास दिसू लागला आहे.
नवउद्योजक आपल्या व्यवसायास स्थिर व्हावेत, म्हणून गेली काही वर्षे प्रकल्पाच्या नवउद्योजक सहायता विभागाद्वारे नवीन उद्योगांना छोट्या प्रमाणात काम (जॉब वर्क) दिले जाते.