डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प महिला समिती च्या कार्यकर्त्यांची श्री.गोळवलकर गुरुजी ग्रामविकास प्रकल्प,गोळवली ला दिनांक-१८ व १९ जानेवारी २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली .साबण बनवणे ,धूप कांडी, फिनेल, पोहे, पापड याचे प्रशिक्षण तसेच गो शाळेला भेट दिली. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री चंद्रशेखर देशपांडे व सौ. वनिता देशपांडे यांच्याबरोबर चर्चा करून प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच समिती म्हणून आपण काय काम आपल्या…
गुरुवार दिनांक-१६ जानेवारी २०२५ रोजी श्री.अर्जुन यशवंत चांदेकर (मान.प्रांत संघचालक, कोकण प्रांत) यांच्या शुभ हस्ते प्रकल्पाच्या प्रशिक्षण व निवास केंद्राच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी प्रकल्पाचे विश्वस्त, समिती कार्यकर्ते, शेतकरी,उद्योजक, हितचिंतक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या कामा संदर्भात तसेच इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती दिली.
संस्थेला श्री. सुनिल मरभळ साहेब ( सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ) यांनी दिनांक-२५/१०/२०२४ रोजी संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी क्लस्टर, संशोधन, प्रशिक्षण, उत्पादन, ग्रामविकास याविषयी माहिती घेतली. संस्थेचे चाललेले काम खुप आवश्यक व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.