नवउद्योजक आपल्या व्यवसायास स्थिर व्हावेत, म्हणून गेली काही वर्षे प्रकल्पाच्या नवउद्योजक सहायता विभागाद्वारे नवीन उद्योगांना छोट्या प्रमाणात काम (जॉब वर्क) दिले जाते.अनेक उद्योजक व शेतकरी बंधूंसाठी त्यांना लागणारा कच्चा माल तसेच उद्योगातून तयार होणारी उत्पादने व शेतीजन्य उत्पादने यांच्या एकत्रित खरेदी विक्री-विक्रीची आवश्यकता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेलि सिंधुदुर्ग जिल्हा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था गेली ३३ वर्षे नव उद्योजक तथा शेतकरी यांना आधार देण्याचे काम सातत्याने करत आहे.
सन-2020-21 पासून फळ प्रक्रिया उद्योजकांच्या नवीन तंत्रज्ञानाच्या आवश्यकता लक्षात घेऊन लघु व सूक्ष्म मंत्रालयाच्या अंतर्गत सामुदायिक सुविधा केंद्र मंजूर झाले असून त्यासाठी कोकण सिंधू मल्टी फ्रुट क्लस्टर फाउंडेशन ही सेक्शन-8 कंपनी स्थापन करण्यात आली आहे. येत्या काळात या कंपनीमार्फत सामुदायिक सुविधा केंद्र सुरू होणार आहे व त्याद्वारे जिल्ह्यातील सूक्ष्म फळ प्रक्रिया उद्योगांना निर्यातक्षम तंत्रज्ञान तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.