श्री. रामेश्वर माऊली शेतकरी गट संचलित मयुर दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित घावनळेच्या इमारतीचे नुतनीकरण व संगणकीकरण याचे उद्घाटन श्री. मनिषजी दळवी साहेब ( सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल उकिडवे सर उपस्थित होते. डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या प्रेरणेतून घावनळे गावात गेली ४ वर्षे काम चालू आहे. व डॉ. प्रसाद देवधर ( भगिरथ प्रतिष्ठान…
रविवार दि. २०/०४/२०२५ रोजी घावनळे गावातील ग्रामदेवता श्री रामेश्वर मंदिर येथे मंदिर स्वच्छता व भुमी सुपोषण / अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः मंदिराच्या आवारात व मंदिरात साफसफाई करण्यात आली. त्यांनंतर गावातील दुध संस्था व दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ यांनी दुधाचा अभिषेक केला व पुढील २ वर्षामध्ये गावामध्ये १००० लिटर दूध दर दिवशी करण्याचा संकल्प केला. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या…
आपल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प माणगाव,तालुका-कुडाळ,जिल्हा-सिंधुदुर्ग.४१६५१९ च्या वतीने काजू बी प्रक्रिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण २१ मार्च ते २८ मार्च २०२५ या दरम्यान सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेमध्ये संपन्न होणार आहे.आपण या प्रशिक्षणासाठी इच्छुक असाल तर ९४०३०७५७२०, ९२८४२६७४९६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निच्छित करावा.तसेच गरजूंपर्यंत हा संदेश पोहचवावा.
डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प महिला समिती च्या कार्यकर्त्यांची श्री.गोळवलकर गुरुजी ग्रामविकास प्रकल्प,गोळवली ला दिनांक-१८ व १९ जानेवारी २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली .साबण बनवणे ,धूप कांडी, फिनेल, पोहे, पापड याचे प्रशिक्षण तसेच गो शाळेला भेट दिली. यावेळी प्रकल्प प्रमुख श्री चंद्रशेखर देशपांडे व सौ. वनिता देशपांडे यांच्याबरोबर चर्चा करून प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच समिती म्हणून आपण काय काम आपल्या…