रविवार दि. २०/०४/२०२५ रोजी घावनळे गावातील ग्रामदेवता श्री रामेश्वर मंदिर येथे मंदिर स्वच्छता व भुमी सुपोषण / अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः मंदिराच्या आवारात व मंदिरात साफसफाई करण्यात आली. त्यांनंतर गावातील दुध संस्था व दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ यांनी दुधाचा अभिषेक केला व पुढील २ वर्षामध्ये गावामध्ये १००० लिटर दूध दर दिवशी करण्याचा संकल्प केला. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आणलेल्या मातीचे पुजन करण्यात आले. ही माती परत आपल्या शेतात टाकून किमान कुंटूबापुरती शेती विषमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानंतर श्री. सुर्यकांत कुंभार यांनी भूमी सुपोषण कार्यक्रमाची आवश्यकता सांगितली. श्री. बाळकृष्ण चव्हाण यांनी भूमीसुपोषणाचे महत्त्व सांगितले. डॉ. प्रसाद देवधर यांनी भूमीसुपोषण, ग्रामविकास, दुध उत्पादन व त्यातील बारकावे विस्तृतपणे मांडले. श्री. आनंद कर्पे गुरुजींनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर पसायदान होऊन हा कार्यक्रम संपला. या भूमीसुपोषण कार्यक्रमासाठी घावनळे गावातील ७८ महिला, पुरुष उपस्थित होते.

