आज रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी श्री दत्त मंदिर, माणगाव येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी १५ गावातील ५६ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत, दीप प्रज्वलन, परिचय व प्रास्ताविक झाले त्यानंतर गटश: निवेदन (मळगाव, गोठोस, अंबडपाल, घावनळे) या शेतकरी गटांचे झाले. त्यानंतर श्री सुमंतजी आमसेकर यांनी
सामूहिक कार्य व कार्यकर्ता असे चर्चात्मक सत्र घेतले. भोजनोत्तर ग्राम संकुल – श्री शेखरजी देशपांडे (गोळवली प्रकल्प) यांनी सत्र घेतले त्यानंतर गटशः चर्चा मध्ये
१) नवीन होणारे शेतकरी गट – श्री रामकृष्ण पंतवालावलकर
२) शेतकरी गटांसोबत चर्चा
( श्री हेमंत मसुरकर, श्रीविष्णू तामाणेकर, श्री तानाजी सावंत श्री संतोष सामंत, श्री बाळकृष्ण चव्हाण श्री प्रसादजी आगवेकर) यांनी गटश: चर्चा घेतली. त्यानंतर त्यांची निवेदन सर्वांसमोर झाले.
त्यानंतर भारतीय किसान संघ सदस्यता नोंदणी हा विषय श्री अभय भिडे यांनी सर्वांसमोर मांडला.
श्री प्रसाद आगवेकर यांनी समारोप केला. पसायदान होऊन प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.