डॉ. हेडगेवार प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली मळगाव गावामध्ये २०१६ मध्ये कल्पवृक्ष शेतकरी गट गटाची स्थापना झाली त्यानंतर २०१७ मध्ये कल्पवृक्ष दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था या नावाने दूध संकलन केंद्र सुरू झाले. सुरुवातीला 18 लिटर असणारे दूध आत्ता ६०० लिटर दर दिवशी संकलित केले जाते. दूध संस्था व शेतकरी गटाचे गावामध्ये असलेले चांगले काम पाहून गोकुळ संस्थेने त्यांना दूध शीतकरण केंद्र सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सध्या दर दिवशी १७,००० लिटर पर्यंत दुधाची हाताळनी बीएमसी(Bulk Milk Cooler) मध्ये होते